27 September 2020

News Flash

लाचखोर जमादार जाळ्यात

तामसा पोलीस ठाण्याचा कर्मचारी लाचखोरीच्या आरोपावरून पोलीस कोठडीत असताना बुधवारी कंधार पोलीस ठाण्यातील पोलीस जमादाराला ३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

| July 18, 2013 01:49 am

तामसा पोलीस ठाण्याचा कर्मचारी लाचखोरीच्या आरोपावरून पोलीस कोठडीत असताना बुधवारी कंधार पोलीस ठाण्यातील पोलीस जमादाराला ३ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
दोन आठवडय़ांपूर्वी पोलीस निरीक्षक उद्धव िशदे याला लाच घेताना पकडले होते. दोन दिवसांपूर्वी तामसा पोलीस ठाण्यातल्या जमादाराला पकडल्यानंतर बुधवारी कंधार पोलीस ठाण्यातील जमादार बाबू सखाराम जाधव याला ३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
कंधार तालुक्यातल्या पोखर्णी येथील निवृत्त सनिक विक्रम कल्याण कस्तुरे यांच्या पत्नीला मारहाण झाली. ३ जूनला हा प्रकार घडल्यावर त्यानी कंधार पोलिसांत तक्रार नोंदवली. आरोपींना अटक करावी, असा आग्रह कस्तुरे यांनी धरला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या जमादार जाधव याने त्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2013 1:49 am

Web Title: corrupt head constable in net
Next Stories
1 महापालिका कारभारामुळे लातूरची लक्तरे वेशीवर
2 जीपला कंटेनरची धडक; १ ठार, १५जण जखमी
3 कुठे मुसळधार, कुठे नुसतीच रिमझिम प्रतिनिधी, औरंगाबाद
Just Now!
X