31 October 2020

News Flash

दत्त शेतकरी कारखान्यास ऊसविकासाचा प्रथम पुरस्कार

शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास बुधवारी राष्ट्रीय पातळीवरील उच्च साखर उतारा गटातील ऊसविकासाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री

| December 19, 2012 08:45 am

 शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास बुधवारी राष्ट्रीय पातळीवरील उच्च साखर उतारा गटातील ऊसविकासाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री के. व्ही. थॉमस यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. सा. रे. पाटील व मुख्य शेती अधिकारी एम. आर. कोरिया, स्वीय सहायक अशोक शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी अध्यक्ष जयंतीभाई पटेल, शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते. यापूर्वी दत्त कारखान्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पारितोषिके मिळालेली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 8:45 am

Web Title: datta shetkari sugar factory got first prize for sugarcane development
टॅग Sugar Cane,Sugarcane
Next Stories
1 साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी कल्लाप्पाण्णा आवाडे
2 उद्याच्या टी-ट्वेंटी सामन्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त
3 उड्डाणपूल बारगळण्याचीच चिन्हे!
Just Now!
X