भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे राष्ट्रसंत नामदेव महाराज यांच्या नावाने महापालिकेने सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी कै. भिकन कृपाराम जगताप बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांच्याकडे करण्यात आली. नामदेव महाराजांच्या ७४३व्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर मागणीचे निवेदन धोंगडे यांना देण्यात आले.
संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेली. धर्माचा प्रचार व प्रसार भारतात सर्वत्र केला. पंजाबी भाषेत अभंग लिहिणारे राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे मराठी लोककवी म्हणून संत नामदेव यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो.
अशा या महान संताच्या कार्याची ओळख पुढील पिढीला होण्याच्या उद्देशाने त्यांच्या नावाने सांस्कृतिक भवनाची उभारणी करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संस्थेचे अध्यक्ष नंदलाल जगताप, ज्ञानेश्वर बावीस्कर, मधुकर कापडणे, मुरलीधर सनांसे, शांताराम शिंपी, सुधाकर गवांदे, अनिल शिरसाठ आदी या वेळी उपस्थित होते.