औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार विक्रम कुमार यांनी सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांच्याकडून स्वीकारला. लवांडे यांनी विक्रम कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, राजेश इतवारे, पुरुषोत्तम पाटोदकर, रिता मैत्रेवार, एस. एस. सुत्रावे, मंजूषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी के. वाय. बोडखे, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा माहिती अधिकारी एस. के. बावस्कर, तहसीलदार विजय राऊत, रूपेश सिंगारे आदी उपस्थित होते. कार्यभार स्वीकारल्यानंतर विक्रम कुमार यांनी जिल्हय़ातील धार्मिक, पर्यटन तसेच टंचाईसदृश व पीकस्थिती, सार्वजनिक वितरण व्यवस्था, भूसंपादन, रस्तेविकास, यूआयडी-दिलासा योजना, संजय गांधी निराधार योजना यांसह विविध शाखांच्या कामांची माहिती घेतली.  महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बी. डी. म्हस्के व राज्याचे कार्याध्यक्ष डी. एम. देशपांडे यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी यापूर्वी मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.