जायकवाडी जलाशयात आवश्यक पाणीसाठा होण्यासाठी वरच्या भागात उपलब्ध पाण्याचे नदीखोरेनिहाय समन्यायी पाणीवाटप करण्याची तरतूद एकात्मिक राज्य जलआराखडय़ात करावी, अशी मागणी मराठवाडा पाणी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी आयोजित बैठकीत करण्यात आली.
जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, अण्णा खंदारे, बुद्धिनाथ बराळ, सुखदेव बन यांची या वेळी उपस्थिती होती. जायकवाडीसह नांदूर मधमेश्वर, पूर्णा, ऊध्र्व पैनगंगा प्रकल्पांसाठी उपलब्ध पाण्याचे नदीखोरेनिहाय समन्यायी पाणीवाटप करावे. तसेच कृष्णा खोऱ्यातील मराठवाडय़ाचे २५ अब्ज घनफूट पाणी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेशी सांगड न घालता मराठवाडय़ास द्यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. या संदर्भात एकात्मिक राज्य जलआराखडय़ात तरतूद करून त्या आधारे जनसुनवाई करावी, राज्य जल मंडळ व राज्य जल परिषदेत जलआराखडा मंजूर करून नदीखोरे अभिकरणाद्वारे पाणीहक्क प्रदान करावा, या हक्कांची महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाद्वारे प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी आदी १८ मागण्याही करण्यात आल्या.
लक्ष्मण वडले, अण्णा सावंत, भानुदास भोजने, प्राचार्या सुनंदा तिडके, बी. वाय. कुळकर्णी, राम गायकवाड, देविदास जिगे, नारायण बोराडे, सुभाष देठे, रावसाहेब ढवळे, गणेशलाल चौधरी, के. एस. पडोळे, यशवंत सोनुने आदींनी समन्यायी पाणीवाटप व जायकवाडी पाणीप्रश्नासह जिल्ह्य़ातील पाणी उपलब्धता व नियोजनाच्या अनुषंगाने विचार मांडले. संजय लकडे यांनी स्वागत केले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘समन्यायी वाटपासाठी राज्य जलआराखडय़ात तरतूद करा’
जायकवाडी जलाशयात आवश्यक पाणीसाठा होण्यासाठी वरच्या भागात उपलब्ध पाण्याचे नदीखोरेनिहाय समन्यायी पाणीवाटप करण्याची तरतूद एकात्मिक राज्य जलआराखडय़ात करावी, अशी मागणी मराठवाडा पाणी संघर्ष समितीच्या वतीने बैठकीत करण्यात आली.
First published on: 20-09-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do the provision for equal distribution of water