04 July 2020

News Flash

डोंबिवलीचा पाणीपुरवठा सोमवारी बंद

डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ८ ते रात्रौ १० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

| October 12, 2013 08:07 am

डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ८ ते रात्रौ १० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे नेतिवली परिसर, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाला पाणीपुरवठा होणार नाही. नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र व बारावे जलशुद्धीकरण केंद्र येथून या भागांना पाणीपुरवठा केला जातो. डोंबिवली विभागास बारावे व नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र येथून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येत असल्याने हा बंद घेण्यात आला आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार प्रमोद कुलकर्णी यांच्याकडून काढून घेतल्यापासून पाणीपुरवठा विभागातील फाइल्स व कामे वेगाने हलू लागली आहेत. आता सक्षम कार्यकारी अभियंता जुनेजा यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2013 8:07 am

Web Title: dombivali water supply off on monday
टॅग Dombivali,Supply
Next Stories
1 त्रिफळाचित.. आव्हाड आणि भाजप
2 आर्थिक मंदीच्या निखाऱ्यांवर मालमत्ता प्रदर्शनांची फुंकर
3 कल्याणच्या तरुणांचा पर्यावरण स्नेही दसरा ‘इको ड्राइव्ह यंगस्टर’ आपटय़ाचे वृक्षारोपण करणार
Just Now!
X