25 November 2020

News Flash

व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

उधारीचे पैसे चुकते केल्यानंतरही पैशासाठी धमक्या मिळत असल्याने या त्रासाला कंटाळून एका तरुण दाल मिल व्यावसायिकाने आत्महत्या केल्यानंतर नंदनवन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

| September 7, 2013 02:02 am

उधारीचे पैसे चुकते केल्यानंतरही पैशासाठी धमक्या मिळत असल्याने या त्रासाला कंटाळून एका तरुण दाल मिल व्यावसायिकाने आत्महत्या केल्यानंतर नंदनवन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यात किशोर कोठारी, सुनील कोठारी (रा. वर्धमाननगर), राजू शर्मा, शिव शर्मा आणि राहुल शर्मा यांचा समावेश आहे. हे पाचही जण पैशासाठी सौरभ मालानी यांना मोबाईलवरून वारंवार धमक्या देत होते. मालानी यांनी या लोकांकडून मालमत्तेच्या मोबदल्यात कर्ज घेतले होते. सर्व रक्कम परत केल्यानंतरही त्यांनी मालानी यांची कागदपत्रे परत दिली नव्हती. उलट पैसे मिळाले नसल्याचे सांगून मालानी यांचा छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून मालानी यांनी अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी आधी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. परंतु, मालानी यांच्या पत्नीने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर या पाचजणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मांढरे तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:02 am

Web Title: fir registered against five people in businessman suicide cases
Next Stories
1 सामाजिक विषमता नष्ट झाली तरच निरोगी समाजाची निर्मिती – डॉ. प्रकाश आमटे
2 शांताराम पोटदुखे यांना गोंडवाना विद्यापीठाचा पहिला समाजभूषण पुरस्कार
3 ‘समाजाला कृतीशील उपक्रमाची गरज’
Just Now!
X