27 November 2020

News Flash

न्यूझिलंडमध्ये हापूसचे पहिले पाऊल

कोकणातील हापूस आंब्याने अमेरिका, इंग्लड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्स्र्झलंड, दुबई, सिंगापूर, हॉगकॉग या देशांवर गेली अनेक वर्षे स्वारी केल्यानंतर पहिल्यांदाच न्यूझिलंड देशातील नागरिकांची चव भागविली आहे.

| April 27, 2013 02:08 am

कोकणातील हापूस आंब्याने अमेरिका, इंग्लड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्स्र्झलंड, दुबई, सिंगापूर, हॉगकॉग या देशांवर गेली अनेक वर्षे स्वारी केल्यानंतर पहिल्यांदाच न्यूझिलंड देशातील नागरिकांची चव भागविली आहे. गेल्या काही दिवसांपासून न्यूझिलंडमध्ये चार हजार डझन हापूस आंबा निर्यात झाला असून यानंतर हाच आंबा ऑस्ट्रेलिया स्वारीसाठी सज्ज झाला आहे.
कोकणातील विशेषत: देवगडमधील हापूस आंब्याची ख्याती जगप्रसिध्द आहे. जानेवारीपासून सुरु झालेली ही हापूस आंब्याची रेलचल आता टिपेला पोहचली असून या महिन्याअखेपर्यंत ती उच्चांक गाठणार आहे. कोकणातील हापूस आंबा जसा देशातील प्रत्येक प्रांतातील नागरिकाला खुणावत असतो तसा तो परदेशातील अनेक देशांना भुरळ घालत असल्याचे गेली अनेक वर्षे दिसून येत आहे. कोकणातील हापूस आणि आखाती देश हे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दुबईत या आंब्याला चांगली मागणी आहे. त्यानंतर इंग्लडमध्ये भारतीयांची संख्या जास्त असल्याने हापूस आंब्याची चव चाखल्याशिवाय येथील भारतीय रहात नाही. गेली अनेक वर्षे अमेरिका, युरोप, आखाती देशातील खवय्याची हौस भागविल्यानंतर आता हापूस थेट न्यूझीलॅन्ड या वेटावर पोहचला आहे.  के. बी एक्सपोर्टच्या प्रकाश खक्कर व कौशल खक्कर या पितापुत्रानी हे कामगिरी केली असून कोकणातील हापूस आंब्याची ही पहिलीच यात्रा आहे. खक्कर यांनी आतापर्यंत दहा कंटेनर भरुन विमानमार्गे हापूस आंबा ऑकलॅन्ड या न्यूझीलॅन्ड मधील प्रदेशात पाठविला आहे. कोकणातील हापूस आंब्याला न्युझिलंड मध्ये चांगली मागणी असल्याचे खक्कर यांनी सांगितले. त्यासाठी योग्य त्या चाचण्या करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा आंबा पाठविताना विमान भाडे अधिक पडत असल्याची तक्रारही त्यांनी केली. शेतामालाच्या निर्यातीसाठी सरकारने काही ठेस पाऊले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यानंतर लवकरच हापूस आंबा ऑस्ट्रेलियावर स्वारी करणार आहे.
कोकणातील हापूस आंबा आणि आखाती देशातील अरब हे एक शेकडो वर्षांचे नाते आहे. त्यामुळेच अशोक डोंगरे या मराठमोळ्या निर्यातदाराने नुकताच दुबईच्या राज्याला शंबर डझन आंबा पाठविला आहे. ही गिफ्ट दुबई, चेन्नई येथे मॉल व्यवसाय करणाऱ्या एका भारतीयाने दिली आहे. देवगडचा हापूस आजही अरबांवर भुरळ घालत असल्याचे दिसून येते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 2:08 am

Web Title: first step of hapus in newzeeland
टॅग Mango
Next Stories
1 स्थायी समितीचा वाद..मागील पानावरून पुढे सुरूच!
2 डोंबिवलीतील ३८८ कुटुंबे रस्त्यावर
3 रजेवर निघालेले राजीव पुन्हा परततील ?
Just Now!
X