News Flash

सिध्देश्वर यात्रेसाठी शिंदे सोलापुरात

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उद्या शनिवारपासून दोन दिवसांच्या सोलापूर भेटीवर येत आहेत. ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी शिंदे हे कुटुंबीयांसह सोलापुरात दाखल होत

| January 11, 2013 09:09 am

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उद्या शनिवारपासून दोन दिवसांच्या सोलापूर भेटीवर येत आहेत. ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेत सहभागी होण्यासाठी शिंदे हे कुटुंबीयांसह सोलापुरात दाखल होत आहेत. उद्या शनिवारी सकाळी शिंदे यांचे रेल्वेने आगमन होणार असून त्यानंतर लगेचच सकाळी आठ वाजता उत्तर कसब्यातील हिरेहब्बू मठापासून सिध्देश्वर यात्रेच्या पहिल्या दिवशी निघणाऱ्या नंदिध्वजांचे पूजन शिंदे कुटुंबीय करणार आहेत. नंतर नंदिध्वजांच्या मिरवणुकीचा शुभारंभ शिंदे हे करतील. दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी सिध्देश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्यास शिंदे हे हजेरी लावणार आहेत.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 9:09 am

Web Title: for siddheshwar pilgrimage sushilkumar shinde in solapur visit
टॅग : Pilgrimage
Next Stories
1 बेशिस्त वाहतुकीने घेतला पोलिसाचा बळी
2 नामांकित मल्लांसह खेळाडू नगरमध्ये दाखल
3 युवा स्फूर्ती प्रतिष्ठान उभारणार नगरला आधुनिक प्रशिक्षण केंद्र
Just Now!
X