04 March 2021

News Flash

फळाफुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

महानगरपालिकेच्या वतीने मोठया प्रमाणावर वृक्षारोपण वृक्षसंर्वधन करण्यात येत असून एकाच ठिकाणी निसर्गाच्या विविधतेचा अनुभव घेता यावा या दृष्टीने मागील आठ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या

| February 21, 2015 12:23 pm

महानगरपालिकेच्या वतीने मोठया प्रमाणावर वृक्षारोपण वृक्षसंर्वधन करण्यात येत असून एकाच ठिकाणी निसर्गाच्या विविधतेचा अनुभव घेता यावा या दृष्टीने मागील आठ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या झाडे, फुले, फळे प्रदर्शनाचे उद्घाटन नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.  विविध स्पर्धेत ५०० हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.
 नवी मुंबई महानगरपालिका वृक्षप्राधिकरणाच्या वतीने नेरूळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्कमध्ये २०, २१ व २२ फेब्रुुवारी रोजी झाडे, फुले, फळे, भाजीपाला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये वृक्षप्रेम वाढीस लागून उत्साह वाढावा या दृष्टीने विविध स्पर्धासह उद्यान स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.  
यामध्ये शैक्षणिक विद्यालये व महाविद्यालय, एमआयडीसी क्षेत्रातील नामवंत कंपन्या तसेच सोसायटय़ांनी उद्यान स्पध्रेमध्ये सहभाग घेतला आहे.
या प्रदर्शनामध्ये सूर्यप्रकाशातील झाडे, सावलीतील झाडे, कुंडय़ांतील झाडे, निवडुंग, झुलत्या फुलांच्या परडय़ा, रस्त्याच्या कडेला लावावयाची फुलझाडे, औषधी वनस्पती, फुलांची रांगोळी, भाज्या, फळे, फुले यांची कलात्मक रचना, शोभिवंत झाडे, वटवृक्ष यांचे वैविध्य यामध्ये अनुभवता येत आहे. ५०० हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 12:23 pm

Web Title: fruit and flower exhibition inaugurated
Next Stories
1 महोत्सव होणे काळाची गरज – पालकमंत्री
2 महानगरपालिकेत आर.आर.पाटील यांना श्रद्धांजली
3 तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या
Just Now!
X