श्री गुरुदेव सार्वजनिक वाचनालय व निर्मिक बहुउद्देशीय विकास मंडळ व गुरुदेव सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १० वर्षांंपासून मोफत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लहान वडगाव व गुरुदेव प्रार्थना मंदिर शिवाजीनगर, लोहारा, यवतमाळ येथे करण्यात आलेले आहे.
या वर्गाता १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांंना इंग्रजी व गणित विषयाचे मोफत मार्गदर्शन दिले जात आहे. ऑक्टोबर २०१३ या सत्रात या वर्गातर्फे १२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ करण्यात आले. त्यापकी १० विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. १० वी चा ७५ टक्के निकाल लागलेला आहे.
या वर्गात नापास विद्यार्थ्यांंसाठी विशेष सराव व मेहनत घेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी हमखास यशस्वी होतो. मागील १० वर्षांचा आढावा घेतला असता या शिकवणी वर्गात बऱ्याचशा विद्याथ्यार्ंनी मार्च २०१४ ही परीक्षा शेवटची संधी आहे.
त्यानंतर हे सर्व विद्यार्थी नवीन कोर्समध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना सीबीएसई पॅटर्नप्रमाणे परीक्षा द्यावी लागणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 19, 2013 8:56 am