सामान्य नागरिकांना लोकशाहीतील आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी व माहिती अधिकाराचा उपयोग करून अनिष्ट गोष्टींना कसा प्रतिबंध करायचा, शासनाशी कसा सुसंवाद साधायचा याविषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल व माहिती अधिकार क्षेत्रातील एक तज्ज्ञ अतुल पाटणकर यांचे डोंबिवलीत व्याख्यान आयोजित केले आहे.
१५ ऑगस्ट, गुरुवार दुपारी चार वाजता डोंबिवली पूर्व भागातील टिळक पथावरील सुयोग मंगल कार्यालयात हे व्याख्यान व चळवळीची सभा आयोजित केली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील जागरूक नागरिकांनी स्थापन केलेल्या ‘सक्रिय नागरिक चळवळ’ संघटनेने या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला व नि:शुल्क आहे.
चळवळीच्या सदस्यांसह अन्य होतकरू, नवीन मंडळींनी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती अधिकार कायद्याची जनजागृती व या माध्यमातून सामान्य नागरिकांना न्याय मिळून देण्याचे कार्य पाटणकर गेले काही वर्षांपासून करीत आहेत. पालिका हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या, विकासकामांचे प्रश्न व अन्य विषयांवर आवाज उठविण्यासाठी चळवळीची मे महिन्यात स्थापना करण्यात आली आहे. संपर्क, प्रा. उदय कर्वे ९८१९८६६२०१.