News Flash

छत्तीसमधील निवडणुकांसाठी महाराष्ट्राची एस.टी. दाखल

छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २०० बसेस मागविण्यात

| November 6, 2013 08:17 am

छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २०० बसेस मागविण्यात आल्या असून तोटय़ात धावत असलेल्या एसटीला यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
राज्यात शहर असो वा गाव तेथे एसटी बस जाते. राज्यभरात एसटीच्या १५ हजाराहून अधिक बसेस रोज धावतात. एसटी आधीच तोटय़ात आहे. डिझेल व वाहनांच्या सुटय़ा भागांमध्ये वाढ झाली. कर्मचाऱ्यांसोबत नुकताच करार झाला आहे.  त्यातच प्रवासी कमी झाल्याने भाडेवाढ केली तरी एसटी आणखीच तोटय़ात गेली आहे. छत्तीसगड राज्यात विधानसभेची निवडणूक होत असून त्यासाठी २०० बसेस मागविण्यात आल्या आहेत. आजपासून २३ नोव्हेंबपर्यंत असे वीस दिवस या बसेस छत्तीसगडमध्ये धावणार आहेत. त्यातून पाच कोटीहून अधिक भाडे एसटीला मिळणार आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक बसवर एसटीला सुमारे वीस हजार रुपये मिळतील. त्यामुळे आधीच तोटय़ात असलेल्या एस.टी. ला काही अंशी दिलासा मिळणार आहे. संपूर्ण भाडे भरल्यानंतरच या बसेस छतीसगड राज्यात रवाना होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 8:17 am

Web Title: maharashtra st in help to chhattisgarh election
टॅग : St Bus
Next Stories
1 हैदराबाद-पाटणादरम्यान विशेष रेल्वेगाडी
2 तुटपुंज्या अनुदानामुळे अतिवृष्टीग्रस्तांमध्ये निराशा
3 काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्यूला लोकसभेसाठी काँग्रेस २९, राष्ट्रवादीला १९ जागा
Just Now!
X