शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनावर बहिष्कार टाकल्याने भौतिकशास्त्राच्या पेपरनंतर संपूर्णपणे मूल्यांकन ठप्प झाले आहे. त्यामुळे जवळपास २ लाखापेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे गठ्ठे नागपूर विभागीय कार्यालयात पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंडळ प्रशासनातील शिक्षकांच्या बहिष्कारमुळे चिंता वाढत असल्याने दुसरीकडे मूल्यांकन चोरी-छुपे होत असल्याचे वृत्त खोटे असल्याने शिक्षक संघटनेने हा खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यातील शिक्षकांनी १०वी आणिा १२वी च्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. शिक्षक संघटनांनी राज्यातील सर्वच विभागीय मंडळासमोर आठवडय़ाभरापूर्वी निदर्शने आंदोलने करत शासनाचा निषेध केला. त्यांनी यावेळी उत्तरपत्रिका आणि साहित्य स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे एकाही विषयांच्या फक्त १२ वीच्या मराठी आणि इंग्रजी विषयांच्या उत्तरपत्रिका वगळता स्वीकारल्या नाही. जवळपास २ लाखापेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपसण्याचे काम अजून सुरू झालेले नाही. भौतिकशास्त्र-१,२, जनरल फाऊंडेशन, राज्यशास्त्र, रसायनशास्त्र(जुना अभ्यासक्रम), पुस्तकपालन लेखाकर्म, गणित आणि संख्याशास्त्र इत्यादी विषयांच्या सर्वच उत्तरपत्रिका तपसण्यासाठी न गेलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये समावेश आहे. यापुढील पेपरच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम ठप्पअसल्यामुळे १२वीच्या आठ ते दहा लाख उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. यासर्वामुळे विद्यार्थी आणि पालकांत अस्वस्थेचे वातावरण निर्माण झाले असून मूल्यांकनादरम्यान शिक्षकांनी आंदोलन ताणून धरल्याने निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र, अशावेळी निकाल वेळेवर लावण्याचा निर्धार बोर्डाने केल्याचे दिसून येते.