घरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांनी सुरक्षारक्षकाचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार बुधवारी पहाटेस घडला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. शहराच्या रिंगरोड परिसरात देसाईनगर भागातील अशोक टांकसाळे यांच्या घरात हा प्रकार घडला.
टांकसाळे हे सिंचन विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी ५ फेब्रुवारीला सपत्नीक अलाहाबादला कुंभमेळ्यास गेले होते. घराची देखभाल करण्यासाठी त्यांनी आपले परिचित शेख शब्बीर बासू (वय ६५) यांना सांगितले होते. प्रवास संपवून टाकसाळे बुधवारी पहाटे घरी आले तेव्हा त्यांना दार किलकिले व शेख यांच्या अंगावर पांघरूण टाकलेले आढळले. घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे दिसून आले. कोणीतरी चोरीचा प्रयत्न केला असावा, हे त्यांच्या लक्षात आले. टांकसाळे पती-पत्नीने शेख यांना लगेच रुग्णालयात नेले, तेव्हा ते मृत असल्याचे घोषित करण्यात आले. शेख शब्बीर या सुरक्षा रक्षकाचा चोरी करणाऱ्यांनी गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या शवविच्छेदनानंतरच नेमकी माहिती लक्षात येईल, असे पोलीस अधीक्षक गायकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2013 रोजी प्रकाशित
सुरक्षारक्षकाचा गळा दाबून खून
घरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांनी सुरक्षारक्षकाचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार बुधवारी पहाटेस घडला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. शहराच्या रिंगरोड परिसरात देसाईनगर भागातील अशोक टांकसाळे यांच्या घरात हा प्रकार घडला.
First published on: 14-02-2013 at 12:41 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murdered of security guard