News Flash

पनवेल एसटी स्थानकात अनैतिक धंद्यांना ऊत

पनवेल एसटी आगारात प्रवाशांमध्ये ‘ग्राहक’ शोधणाऱ्या त्या महिलांच्या नजरा.. सार्वजनिक शौचालयाच्या समोर असलेल्या एका पडीक स्कूटरवर बैठक मारून बसलेल्या त्या ‘चारचौघी’..

| July 26, 2014 02:11 am

पनवेल एसटी आगारात प्रवाशांमध्ये ‘ग्राहक’ शोधणाऱ्या त्या महिलांच्या नजरा.. सार्वजनिक शौचालयाच्या समोर असलेल्या एका पडीक स्कूटरवर बैठक मारून बसलेल्या त्या ‘चारचौघी’.. गडद रंगाचे कपडे, भडक आणि काहीसा भयावह मेकप, पान खाऊन लाल झालेले तोंड आणि ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी सुरू असलेले अश्लील हावभाव.. हे दृश्य पनवेल एसटी स्थानकातून रोज प्रवास करणाऱ्यांना नित्याचे झाले आहे. आगारात नव्याने आलेला प्रवासी मात्र यामुळे गांगरून जातो. देहविक्री करणाऱ्या या महिलांचा वाढता वावर प्रवाशांना तापदायक ठरत आहे. तर महिलांना असह्य होत आहे.
पनवेल स्टँडवर दिवस-रात्र प्रवाशांची वर्दळ असते. या स्थानकातील अस्वच्छतेमुळे प्रवाशांना उभे राहणेदेखील मुश्कील झाले आहे. रात्री अनेकदा परिसरातील ‘तळीराम’ स्टँडमध्ये येऊन ‘हक्का’ने तेथील प्रवाशांच्या बाकडय़ावर आडवे झालेले दिसतात. हा सर्व त्रास सहन करत उभ्या असलेल्या या प्रवाशांना देहव्रिकी करणाऱ्या या महिलांच्या नजरा छळू लागल्या आहेत. आगाराच्या भिंतीजवळील एका कोपऱ्यात अनेक दिवसापासून पडून असलेल्या स्कूटरजवळ या महिलांनी अड्डा बनवला आहे. रेडलाइट बनू पाहत असलेला कोपरा प्रवाशांसाठी मात्र त्रासदायक ठरत आहे. स्टँडवरील चौकशी कक्षाच्या मागे प्रवाशांना बसण्यासाठी सिमेंटचा चौथरा आहे. तेथे सहसा काळोख असतो. त्याच चौथऱ्याचा उपयोग या महिला करतात. विशेष म्हणजे त्यांच्या मदतीकरता एक ‘रक्षक’ही तैनात असतो. तो शौचालयाजवळ उभा राहून या महिला आणि त्यांच्याकडे येणाऱ्या ‘ग्राहकां’वर ‘नजर’ ठेवतो. आगारामध्ये पोलीस आले की ही सर्व मंडळी तेथून गायब होतात. पनवेल स्टँड अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. आगारातील अस्वच्छतेमुळे त्या िंठकाणी घाणीमुळे येणारा दर्प सहन करीत आणि डासांशी सामना करीत उभे राहावे लागते. पावसाळ्यात तर स्टँडचा अक्षरश: नरकच बनतो. यात देहविक्री करणाऱ्या या महिलांच्या अड्डय़ामुळे ‘टपोरीं’चादेखील वावर वाढला आहे. पोलिसांनी वेळीच या सगळ्या प्रकाराचा बंदोबस्त न केल्यास एका कोपऱ्याचा विस्तार होत होत संपूर्ण स्ँठडचाच ‘कामाठीपुरा’, होऊ शकतो, अशी भीती पनवेलच्या स्टँडवरून नियमितपणे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना वाटत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 2:11 am

Web Title: prostitution at panvel st station
टॅग : Prostitution
Next Stories
1 एमआयडीसीचे एक हजार कोटी रुपयांचे भूखंड विक्रीसाठी खुले?
2 उरणच्या किनारपट्टीवर तेलाचा तवंग
3 पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी
Just Now!
X