08 August 2020

News Flash

सोनईतील तिहेरी हत्याकांड तपासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सोनईतील तिहेरी हत्याकांडाच्या तपासात पोलीस बोटचेपेपणाची भुमिका घेत असून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करत लोकअधिकार संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

| February 9, 2013 02:56 am

सोनईतील तिहेरी हत्याकांडाच्या तपासात पोलीस बोटचेपेपणाची भुमिका घेत असून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करत लोकअधिकार संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले व त्यांच्या भावना सरकापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले. अनंत लोखंडे, अरूण जाधव, मेहबूब सय्यद, बापू ओहोळ,
विजय काळे, शिवाजी गांगूर्डे, सुधीर साळवे, माणिक वाघ,
साहेबराव पाचारणे आदींचा
आंदोलनात सहभाग होता.
पालकमंत्री बबनराव पाचपुते, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या. बराच काळ प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही, त्यामुळे आंदोलक संतप्त झाले. निषेधाच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदूमवून टाकला. काहींनी डॉ. जाधव यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. अखेर डॉ. जाधव यांनी स्वत:च बाहेर येऊन आंदोलकांकडून निवदेन स्वीकारले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2013 2:56 am

Web Title: protest in front of distrect officer office for investigation of murdered case in sonai
Next Stories
1 शिवसैनिकांना सत्तेत वाटा हवा- झावरे
2 यशवंतराव गडाख यांना पुणे विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव’ पुरस्कार
3 प्रकरण मुले विक्रीचे, समस्या दारिद्रय़ाची
Just Now!
X