विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून यादरम्यान निघणाऱ्या मोर्चामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग पोलिसांनी जाहीर केले आहेत.
मंगळवारी बाजार, छावणी मैदानातून निघणारे मोर्चे मेश्राम पुतळा चौक, कॉफी हाऊस, लिबर्टी टॉकीजपुढे पोहोचतील. या मार्गाने मोर्चा जात असताना वाहतूक म्ांगळवारी बाजार चौकातून सरळ जाईल. मेश्राम पुतळा चौक, छावणी वाय पॉईन्ट, कॉफी हाऊस, गड्डीगोदाम चौक, पाटणी चौक, लिबर्टी टॉकीज, बिशप कॉटन स्कूलकडे वाहतूक वळविली जाईल. एलआयसी चौकाकडे येणारी वाहतूक पाटणी चौक, गड्डीगोदाम, कडबी चौक, लिबर्टी टॉकीजकडून, एलआयसी चौकाकडे येणारी वाहतूक लिबर्टी टॉकीज चौकाकडून कॉफी हाऊस चौकाकडे किंवा बिशप कॉटन स्कूलकडे जाईल.
इंदोरा मैदानातून निघणारे मोर्चे इंदोरा चौक, गड्डीगोदाम चौक, पाटणी ऑटोमोबाईल मार्गाने एलआयसी चौकात पोहोचतील. या मार्गाने मोर्चा जात असताना वाहतूक इंदोरा चौक, कमाल टॉकीज चौक, १० नंबर पूल, कडबी चौक, इटारसी पूल, गड्डीगोदाम चौक, पाटणी ऑटोमोबाईल, कॉफी हाऊस चौकातून वळवली जाईल. लिबर्टी टॉकीज चौकाकडून एलआयसी चौकाकडे येणारी वाहतूक लिबर्टी टॉकीज चौकाकडून कॉफी हाऊसकडे किंवा बिशप कॉटन स्कुलकडे जाईल. रेशीमबाग मैदानातून निघणारे मोर्चे मॉरेस कॉलेज चौक अथवा टेकडी मार्गावर अडवले जातील. रेशीमबाग मैदानातून निघणारे मोर्चे अप्सरा चौक, सी. पी. अ‍ॅन्ड बेरार कॉलेज, महाल, टिळक पुतळा, सुभाष रोड, शनी मंदिर, मुंजे चौक, व्हरायटी चौकमार्गे मॉरेस कॉलेज चौकात पोहोचेल. या मार्गावरून मोर्चा जात असताना आवारी चौक, अप्सरा चौक, सी. पी. अ‍ॅन्ड बेरार, महाल, बडकस चौक, झेंडा चौक, गांधी गेट, चिटणीस पार्क, टिळक पुतळा चौक, नातिक चौक, गणेश मंदिर वळण, आग्याराम देवी चौक, कॉटन मार्केट, दुर्गा देवी मंदिर मार्गे शनी मंदिर, आनंद टॉकीज चौक, मुंजे चौक , झासी राणी चौक, व्हरायटी चौकातून वाहतूक वळवली जाईल.
यशवंत स्टेडियमपासून निघणारे मोर्चे मुंजे चौक, शनी मंदिरमार्गे टेकडी रोडवर थांबतील. मोर्चा जात असताना संबंधित चौकांतून वाहतूक वळविली जाईल. चाचा नेहरु बालाद्यानापासून निघणारे मोर्चे आग्याराम देवी चौक, लोखंडी पुलाखालून टेकडी रोडवर जातील. मोर्चा जात असताना गणेश मंदिर वळण, आग्याराम देवी चौक, कॉटन मार्केट चौक, मोक्षधाम चौक, नाका नंबर दहा, मानस चौक व टेकडी रोडवरून वाहतूक वळवली जाईल. चिटणीस पार्कपासून निघणारे मोर्चे अग्रसेन चौक, मेयो चौक, जयस्तंभ, हिस्लॉप महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या बंगल्यापुढे अडवले जातील. मोर्चा जात असताना गांधी गेट चौक, नातिक चौक, बडकस चौक, अग्रसेन चौक, गांधी चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक, दोसर भवन चौक, संत्रा मार्केट ओव्हर ब्रिजवरून कॉटन मार्केटकडे व जयस्तंभ चौकावरून मानस चौककडे वाहतूक वळवली जाईल. एलआयसी चौकाकडून जयस्तंभ चौककडे वाहतूक जाऊ नये म्हणून वाहतूक पाटणी टी पॉईन्ट, गड्डीगोदामकडे वळवली जाईल. लिबर्टी टॉकीजकडून एलआयसी चौकाकडे येणारी वाहतूक लिबर्टी टॉकीजकडून कॉफी हाऊस चौकाकडे किंवा बिशप कॉटन स्कूलकडे वळविली जाईल.
व्हरायटी चौकाकडून येणाऱ्या मार्गावर जुने मॉरेस कॉलेज टी पॉईन्ट येथे मोर्चा थांबल्यानंतर आवश्यकतेनुसार व्हरायटी चौकाकडून येणारा  मार्ग बंद ठेवला जाईल. ही वाहतूक व्हरायटी चौकाकडून महाराजबाग चौकाकडे व सीताबर्डी मेन रोडकडे वळविण्यात येईल. टेकडी रोडवर मोर्चा थांबल्यानंतर, मॉरेस कॉलेज टी पॉईन्ट ते मानस चौक आणि मानस चौक ते मॉरेस कॉलेज टी पॉईन्ट हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी दुतर्फा बंद राहील. मानस चौकाकडून मॉरेस कॉलेज टी पॉईन्टकडे जाणारी रहदारी अशावेळी मानस चौकापासून मुंडा देऊळ मार्गाने वळविण्यात येईल. कॉटन मार्केट चौकाकडून मानस चौकाकडे येणारी वाहतूक मालवीय मार्गाने आनंद टॉकीजकडे वळविण्यात येईल. रेल्वे स्टेशनकडून मानस चौकाकडे येणारी वाहतूक कॉटन मार्केट चौकाकडे वळविण्यात येईल आणि मॉरेस टी पॉईन्टकडून मानस चौकाकडे जाणारी रहदारी सरळ व्हरायटी चौकाकडे वळविण्यात येईल. मोर्चाचे स्वरूप अतिशय मोठे असल्यास किंवा एकाच वेळी एकापेक्षा जास्त मोर्चे मॉरेस टी पॉईन्टवर आल्यास राहाटे कॉलनी चौकाकडून मॉरेस टी पॉईन्टवर शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलावरून येणारी वाहतूक बंद करण्यात येईल. अशावेळी राहाटे कॉलनी चौकातून मॉरेस टी पॉईन्टवर जाणारी वाहतूक उड्डाण पुलाखालील मार्गाने जनता चौक, व्हरायटी चौक, महाराजबाग चौकाकडे किंवा सीताबर्डी मेन रोडकडे वळविण्यात येईल. श्री मोहिनी कॉम्प्लेक्स ते आरबीआयदरम्यान हिस्लॉप कॉलेज प्राचार्य बंगल्यासमोर मोर्चा थांबल्यानंतर जयस्तंभ चौकाकडून श्रीमोहीनी वाय पॉईन्टकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद राहील.