पावसाळ्यापूर्वीची उपाययोजना म्हणून महापालिकेतर्फे १ मेपासून पिवळी नदी स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेचे निरीक्षण महापौर प्रा. अनिल सोले, महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी या मोहिमेचे निरीक्षण करून योग्य ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
गोरेवाडा येथे या नदीचा उगम आहे. तेथून ही नदी वाहात कळमनाच्या पुढे नागनदीला मिळते. परंतु या नदीच्या पात्रात ठिकठिकाणी झाडे-झुडपे वाढली असून गाळ साचल्याने अनेक भागात पावसाळ्यात या नदीचे पाणी शिरत असल्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी रोष निर्माण होत असते. यावर्षी मात्र महापालिकेने प्रथमच स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ मेपासून ही मोहीम राबविण्यात येत असून ती १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. ही मोहीम लोकसहभागातून राबविण्यात येत असून विविध ठिकाणी ६ पोकलेन यंत्राद्वारे नदीतील गाळ व कचरा काढण्यात येत आहे. तसेच महापालिकेतर्फे जवळपास ३०० कर्मचारी राबत आहेत. जेथे नदीचे पात्र रुंद करण्यात आले व कचरा काढण्यात आला, तेथे पाण्याचा योग्य प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनाही हायसे वाटत आहे. अनेक नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.
गोरेवाडा तलाव, गोरेवाडा घाट, नारा, कळमना घाट, कळमना जुना चुंगी नाका, भवानीमंदिर मागील नदीचे पात्र स्वच्छ करण्यात येत आहे. या परिसरात पोकलेनद्वारे नदीचे रुंदीकरण करून गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. गोरेवाडा तलावापासून ते गोरेवाडा घाटपर्यंत नदीच्या पात्रात बेशरमच्या झाडांचे जंगलच होते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबून शेजारच्या वस्तीत पाणी शिरत असे. या मोहिमेत ही झाडे व गाळ पूर्णपणे काढण्यात आला असून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना यावर्षी पुराच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. ज्या ठिकाणी पिवळी नदीचा उगम सुरू  झाला, त्या ठिकाणच्या पात्रात उद्या, शनिवारी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
पिवळी नदीच्या उगम स्थानापासून पात्रात स्वच्छता मोहीम सुरू असलेल्या स्थळाची शुक्रवारी महापौर प्रा. अनिल सोले आणि आयुक्त श्याम वर्धने यांनी पाहणी केली. त्यांच्या समवेत स्थायी समिती सभापती नरेंद्र बोरकर, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, आरोग्य समिती सभापती रमेश सिंगारे, कर समितीचे सभापती गिरीश देशमुख, नगरसेविका मनीषा घोडेस्वार, नगरसेवक गौतम पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, आदींचा समावेश होता.
या दौऱ्याच्या वेळी कळमना पुलाखालून वाहणाऱ्या नदीच्या सुरक्षा भिंतीलगतचा गाळ काढणे सुरू होते. तसेच पाणी वाहण्यात अडथळा न येण्यासाठी ‘डी’ कटींग करण्यात येत होती. पुलाखाली असलेला गाळ व कचरा कामगारांच्या मदतीने काढणे सुरू होते. नदीपात्रात अडथळा निर्माण करणारे झाडे, कचरा, गाळ काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करा, असे निर्देश महापौर सोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ज्या नागरिकांनी नदीच्या पात्रात अतिक्रमण केले त्यांचा शोध घेऊन त्यांना महापालिकेतर्फे अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावण्यात येईल. ठराविक मुदतीत त्यांनी अतिक्रम हटवले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच जे नागरिक नदीच्या पात्रात कचरा किंवा माती टाकतात, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त वर्धने यांनी सांगितले.

पहिलाच प्रयत्न- महापौर
पिवळी नदी स्वच्छता मोहीम राबवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यावर्षी संपूर्ण नदीची स्वच्छता होणार नसली तरी ती पुढीलवर्षीही राबविण्यात येईल. नदीचे पात्र रुंद केल्याने व गाळ काढून पात्र स्वच्छ केल्याने पाण्याचा प्रवाह वाहता झाला आहे. या वर्षी गोरेवाडा तलावाजवळील पिवळी नदीच्या पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येईल. तसेच उत्तर भारतीयांचा सण छटपुजेचा कार्यक्रमही येथे आयोजित करण्यात येईल. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महापौर सोले यांनी या निरीक्षण दौऱ्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना केले.  कारवाई करू – आयुक्त 

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा