27 November 2020

News Flash

चिमुकल्या अथर्वने केली एमएससीआयटी उत्तीर्ण

संगणक हाताळणे किंवा त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी अनेकांची धांदल उडते, परंतु अवघ्या सात वष्रे वयाच्या अथर्वने पहिल्याच प्रयत्नात एमएससीआयटीची परीक्षा उत्तीर्ण करून जिल्ह्य़ात नावलौकीक मिळवला आहे.

| February 10, 2013 12:47 pm

संगणक हाताळणे किंवा त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी अनेकांची धांदल उडते, परंतु अवघ्या सात वष्रे वयाच्या अथर्वने पहिल्याच प्रयत्नात एमएससीआयटीची परीक्षा उत्तीर्ण करून जिल्ह्य़ात नावलौकीक मिळवला आहे. या परीक्षेत त्याला ८१ टक्के  गुण मिळाले आहेत.
सुंदरखेड येथील रवींद्र साळवे व नीता साळवे यांचा अथर्व मुलगा असून सेंट जोसेफमध्ये दुसरीत शिकत आहे. आई संगणकावर काम करीत असल्यामुळे त्याला लहानपणापासूनच संगणकाची आवड निर्माण झाली. तीन वर्षांचा असतांनाच तो संगणक हाताळीत होता. संगणकामधील फ ोटोशॉप, कोरल ड्रॉ यासारखे सॉफ्टवेअर तो लिलया हाताळतो. संगणकाची आवड असल्यामुळे पालकांनी त्याला आकांक्षा कॅम्पुटरमध्ये प्रवेश देऊन एमएससीआयटीच्या परीक्षेला बसविले. या परीक्षेत तो पहिल्याच प्रयत्नात ८१ टक्के  गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. संगणक च नव्हे, तर त्याला चित्रकला, क विता आणि कल्पक वस्तूच्या निर्मितीचा छंद आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आईवडील, आकांक्षा कॉम्प्युटरचे संचालक विजय पाटील यांना देतो. याबद्दल त्याचे सर्वत्र क ौतुक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 12:47 pm

Web Title: seven year old aatharva pass out the mscit exam
टॅग Exam,Result
Next Stories
1 राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे नागपुरात २७ फेब्रुवारीपासून ग्रंथोत्सव
2 शेषराव खोडे यांचे निधन
3 सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू; कामगारांच्या आंदोलनाने तणाव
Just Now!
X