भारतीय व्यवस्थापनशास्त्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिद्धांताचा वेध म्हणजे ‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’ या व्याख्यानाचे आयोजन अशोकपुष्प पब्लिकेशनच्या वतीने मंगळवारी विष्णुदास भावे नाटय़गृहात आयोजित करण्यात आले होते. निमित्त होते ते नवी मुंबई उद्योगश्री पुरस्कार सन्मान सोहळा. प्रा. नामदेवराव जाधव मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करून मराठी माणसानेदेखील उद्योगधंदात प्रगती केली पाहिजे. कोणावर टीका करत वेळे दवडण्यापेक्षा काम करण्यात वेळ घालवावा, असे म्हणाले. तसेच कोणत्याही एका विषयात जीव ओतून काम करत त्यामध्ये नैपुण्य मिळवावे असे सूचित केले. या वेळी उपस्थितांनीदेखील टाळ्यांनी कडकडाटाने दाद दिली.