06 July 2020

News Flash

शिवसेनाप्रमुखांचे विचार खरे स्वराज्य देतील – प्रमोद तोडकर

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साप्ताहिक मार्मिक, दैनिक सामनाचे संपादक व महान चित्रकार म्हणून जगभर ख्याती मिळवून राहताना, प्रखर देशभक्त, हिंदुत्ववादी व समाजहितैषी असा त्यांचा अवघ्या हिंदुस्थानवर

| November 18, 2013 01:55 am

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साप्ताहिक मार्मिक, दैनिक सामनाचे संपादक व महान चित्रकार म्हणून जगभर ख्याती मिळवून राहताना, प्रखर देशभक्त, हिंदुत्ववादी व समाजहितैषी असा त्यांचा अवघ्या हिंदुस्थानवर ठसा होता. हिंदुत्ववादी विचारांनी बहरलेल्या तमाम जनतेचे ते आधारवड होते. त्यांच्या विचारांची हिंदुस्थानच्या खऱ्या स्वराज्यासाठी नितांत गरज असल्याचे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रमोद तोडकर यांनी सांगितले.
येथील जिजामाता चौक, गजानन चौक, नटराज गणेश मंडळ, गजानन नाटय़मंडळ व शशिराज करपे मित्र मंडळातर्फे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन प्रमोद तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दीपक वसगडेकर, राजू कोरडे, बापू करपे, संदीप वसगडेकर, विलास बेडके, बापू माने, सतीश लोहार, दीपक कोरडे, सागर वसगडेकर नेताजी वसगडेकर आदी शिवसैनिक व हिंदुत्ववादी कार्यकत्रे उपस्थित होते. जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जागवल्या.
दीपक वसगडेकर म्हणाले, की शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या विचारांच्या शिदोरीवर मार्गक्रमण केल्यास हिंदुस्थान अल्पावधीत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. समाजसुधारकांना अभिप्रेत हिंदुस्थान घडविण्याची ताकद केवळ शिवसेनाप्रमुखांच्या विचारातच असल्याचा ठाम विश्वास देताना, शिवसेनेच्या विचारांचा वारसा पुढे कायम ठेवणे हीच बाळासाहेब ठाकरे यांना खऱ्याअर्थाने श्रद्धांजली ठरेल असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2013 1:55 am

Web Title: shivsena suprimos views will give true autonomy pramod todkar
टॅग Karad
Next Stories
1 विघटित होत चाललेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी विनोदाचे माध्यम उपयोगी- गोडबोले
2 गोदावरी उजव्या कालव्यातून रब्बीसाठी दोन आवर्तने
3 शिवसेनाप्रमुखांना महाबळेश्वर येथे आदरांजली
Just Now!
X