शहरातील बहुतांशी मोठय़ा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी समाज जागृतीच्या उपक्रमांवर विशेष भर दिला आहे. मोठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे समाज प्रबोधनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, जनजागृती असे विविध उपक्रम राबवित आहेत. भेंडे ले-आऊटमधील श्री सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळाने सामाजिक बांधीलकीचा वसा जोपासला असून यावर्षी ग्राम सफाई व वृक्षारोपणावर लक्ष केंद्रित केले आहे.
मंडळ यावर्षी २६ वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. मंडळाची स्थापना झाली त्यावेळी त्याचे स्वरूप एका रोपटय़ाप्रमाणे होते. आज त्या रोपटय़ाने वटवृक्षात रूपांतर झाले आहे. नागपुरातूनच नव्हे तर राज्याच्या इतर भागासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश राज्यांतूनही भाविक येथे दर्शनाला येतात. मंडळाला १९९६ पासून नागपूर व राज्य स्तरावर आयोजित विविध स्पर्धामध्ये सलग पुरस्कार प्राप्त होत आहेत. नागपूर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित गणेशोत्सव स्पर्धा, दै. लोकसत्ता, दै. नवभारत, स्टार माझातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धाचा समावेश आहे. सवरेत्कृष्ट गणेश मंडळ, सवरेत्कृष्ट देखावा, सवरेत्कृष्ट गणेशमूर्ती यासाठी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षांत ‘गुटखा बंदी’वर लक्ष केंद्रित केले. या उपक्रमांतर्गत कॅन्सर तपासणी शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, कायदेविषयक माहिती देण्यासाठी शिबीर, नेत्रदान शिबीर आयोजित करण्यात आले. जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविली आहे. स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अमृत संदेश या पुस्तिकेच्या एक लाख प्रती वितरित केल्या. मंडळाने क्रीडा तसेच किल्ले स्पर्धाही आयोजित केल्या.
मंडळाने आजवर साकारलेल्या देखाव्यांमध्ये भाविकांना अष्टविनायक दर्शन, अयोध्या येथील राम मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, रामटेक येथील अंबाळा तलावाजवळील पुरातन मंदिर, शिर्डी येथील साई मंदिर, उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिर आदी देखावे साकारले आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळात भेटी दिल्या असून सामाजिक कार्य व देखाव्यांची प्रशंसा केली.
यावर्षी मंडळाने ब्रह्मांडाचा देखावा साकारून भक्तांना स्वर्गाची परिक्रमा घडवून आणली आहे. यामध्ये भगवान विष्णूंचे दशावतार साकारण्यात आले आहेत. उंच मंदिरात हनुमंताचे दर्शन घेऊन भक्तांना आकाशात ढगांमधील सूर्यदेवाचे दर्शन होत आहे. कुर्म, वराह, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलकी अवतार व कथादृष्ये साकारली आहेत.
विलोभनीय गणरायाचे दर्शन स्वर्गलोकात ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वती, लक्ष्मी व सरस्वती यांच्यासह भक्तांना होत आहे. यावर्षी मंडळ ग्रामसफाई, वृक्षारोपण, रेन हार्वेस्टिंग हे उपक्रम राबवित आहे, असे श्री सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळाचे संयोजक रमेश राऊत यांनी सांगितले.

 

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात
E bus service started on behalf of State Transport Corporation during Chaitrotsav nashik
नाशिक-सप्तश्रृंग गड ई बससेवा