कल्याणमधील ‘सुभेदार वाडा’ येथील गणेशाची विसर्जन मिरवणूक लेझीम आणि ढोल-ताशाच्या गजरामध्ये मोठ्या दिमाखात  पार  पडली. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी नागरिकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. ही विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. मिरवणुकीत पारनाका येथील ‘अभिनव विद्यामंदिर’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी  लयबद्ध  लेझीम नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे कल्याणमधील तरुणांनी स्थापन केलेल्या ‘स्वराज्य’ ढोल पथकाच्या जोशपूर्ण ढोल वादनाने वातावरणात उत्साह भरला. या ढोल पथकातील  चिमुरडा वादक राहुल घोसाळकरच्या ताशा वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. छोट्या राहुलचे लोकांनी खूप कौतुक केले, तर काही जणांनी त्याला बक्षीस सुद्धा दिले. मंत्रमुग्ध करणारया या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या आठवणी मनात आणि मोबईल फोनेमध्ये साठवत गणेश भक्तांनी गणरायाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती केली.