लखनौच्या राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळेचे संचालक बी. व्ही. खरसडे यांनी तुळजाभवानी मूर्तीची गुरुवारी सुमारे २० मिनिटे गाभाऱ्यातून पाहणी केली. जगदंबा मूर्तीची सर्व अंगांनी छायाचित्रं काढून या बाबत केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाला अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जुलैच्या अखेरच्या आठवडयात पुन्हा तीन सदस्यांची समिती मूर्तीची पाहणी करण्यास येणार आहे. त्या वेळी स्कॅिनग यंत्रणेचा वापर करून मूर्तीची झीज होत आहे की नाही याची सूक्ष्म पाहणी केली जाणार आहे. पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे व भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर यांनी ही पाहणी अत्यंत सकारात्मक झाल्याचे सांगितले. मंदिराचे व्यवस्थापक सुजित नरहरे, सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, पाळीकर मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अशोक श्यामराज, याशिवाय दिनेश क्षीरसागर, समाधान परमेश्वर, राजाभाऊ मलबा, नागेश अंबुलगे, अरिवद अपसिंगेकर, नागनाथ भांजी, संजय पेंदे आदींची या वेळी उपस्थिती होती.