‘टाटा लिटरेचर लाइव्ह’तर्फे नरिमन पॉइंटच्या ‘एनसीपीए’च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई लिट फेस्ट-२०१३’ला सुरुवात झाली असून हा महोत्सव १७ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. याच महोत्सवात इंग्रजीतून लिहिणाऱ्या भारतीय लेखकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुस्तक पुरस्कारासाठी दोन्ही गटात मिळून सहा लेखकांचा समावेश आहे. महोत्सवाच्या ठिकाणी बोरिया मुजुमदार यांनी तयार केलेले क्रिकेटच्या आठवणीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी साहित्यप्रेमी आणि रसिकांना विनामूल्य प्रवेश असून लेखक-प्रकाशक संवाद, साहित्यावर आधारित कथा, कविता यांचे सादरीकरण, चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशन, छायाचित्र प्रदर्शन, कला प्रदर्शन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
पुस्तकासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची अंतिम निवड यादी. या पैकी दोन्ही गटातून प्रत्येकी एकाची निवड केली जाणार असून त्याची घोषणा समारोहाच्या सांगता समारंभात केली जाणार आहे.
काल्पनिक कथा-कादंबरी गट- चेतनराज श्रेष्ठ (द किंग्ज हार्वेस्ट), शोवन चौधरी (द कॉम्पिटंट अॅथॉरिटी), श्रीकुमार सेन (द स्किनिंग ट्री) वास्तवावर आधारित कथा-कादंबरी गट- अनन्या वाजपेयी (राईट्स रिपब्लिक), साबा नक्वी (इन गुड फेथ), पीटर स्मेटासेक (बटरफ्लाईज ऑन द रुफ ऑफ द वर्ड)
या पुरस्कारांसांठी मार्क टुली, संतोष देसाई, दिलीप पाडगावकर, आशुतोष पांडेय आणि अनिल धारकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.