News Flash

‘फूट पाडणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे’

जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत शिवसेनेच्या एकजुटीचा विजय झाला आहे. शिवसेनेत फूट पाडू पाहणाऱ्या, गट-तटाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला माजी आमदार गजानन घुगे

| February 14, 2013 12:38 pm

नामोल्लेख टाळून घुगे यांचा खासदार वानखेडेंना टोला
जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत शिवसेनेच्या एकजुटीचा विजय झाला आहे. शिवसेनेत फूट पाडू पाहणाऱ्या, गट-तटाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला माजी आमदार गजानन घुगे यांनी खासदार सुभाष वानखेडे यांचे नाव न घेता पत्रकारांशी बोलताना लगावला.
जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडणुकीचा निकाल ठरवून दिलेल्या सदस्य संख्येच्या कोटय़ाप्रमाणे होऊन सर्वाधिक संख्या असलेल्या शिवसेनेचे १४ सदस्य निवडून आले. सेनेतील गटबाजीचा फटका या निकालास बसणार काय याची जिल्ह्य़ात चर्चा होती. निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार घुगे म्हणाले की, जि.प.त शिवसेनेला सत्ता मिळाली. या सत्तेचा उपयोग जनतेच्या हिताची व विकासाची कामे करण्यासाठी केला जातो. सेनेला खिंडार पाडण्याची भाषा व गटबाजीचे राजकारण करणाऱ्यांनी या निकालापासून धडा घ्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:38 pm

Web Title: the dividers should examine them self
टॅग : Election
Next Stories
1 महिलेचे गंठण पळविणाऱ्या दोघांना न्यायालयीन कोठडी
2 गणवेशप्रकरणी मनसेचा आंदोलनाचा इशारा
3 आठवडय़ातून केवळ ४० मिनिटेच मिळते पाणी!
Just Now!
X