News Flash

निवृत्त मेजरच्या वाहनांची डोंबिवलीत मोडतोड

भारतीय सैन्यातून मेजर पदावरून निवृत्त झालेल्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या दोन चारचाकी वाहनांची बुधवारी रात्री काही अनोळखी व्यक्तींनी मोडतोड केली आहे.

| September 20, 2013 06:41 am

भारतीय सैन्यातून मेजर पदावरून निवृत्त झालेल्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या दोन चारचाकी वाहनांची बुधवारी रात्री काही अनोळखी व्यक्तींनी मोडतोड केली आहे. पांडुरंगवाडीतील अनुजा इमारतीसमोर हा प्रकार घडला आहे.
मेजर विनय देगावकर यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एक नगरसेवक व गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवर देगावकर यांनी संशय व्यक्त केला आहे. देगावकर यांनी सांगितले, गेले महिनाभर आपण आपल्या इमारतीसमोर गणेशोत्सव साजरा होऊ नये म्हणून पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत होतो. या गणेशोत्सवात वाजविण्यात येणाऱ्या साधनांमुळे परिसरात शांततेचा भंग होतो. या भागातील नागरिकांनीही या उत्सवाविषयी नाराजी व्यक्त केली होती. पोलीस ठाण्यात याप्रकरणी अर्जही दिला होता. मात्र पोलीस तसेच महापालिकेने परवानगी दिल्याने हा उत्सव साजरा झाला. आपल्या विरोधाला लक्ष्य करण्यासाठी गाडय़ांची मोडतोड केली असण्याची शक्यता देगावकर यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 6:41 am

Web Title: the vehicle debris of retired major
टॅग : Dombivali,Thane
Next Stories
1 बदलापूर बलात्कार प्रकरण: संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची सेनेची मागणी
2 ‘सुभेदार वाडा’ गणपतीचे जल्लोषात विसर्जन
3 टीएमटीच्या ताफ्यात ३०० नव्या बसेस
Just Now!
X