शहरातील बंद असलेल्या त्रिमूर्ती स्टॉक प्लाय या कारखान्यावर पोलिसांनी गुरुवारी पहाटेस छापा टाकून विद्युत मोटारी, पत्रे, लोखंडी सामान या पाच टन भंगारासह मालमोटार असा १९ लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी ८ आरोपींना पोलिसांनी अटक केली.
घटनास्थळी एमएच १९ झेड ७४५ हा टेम्पोही पोलिसांना आढळला. दिलीप सदाशिव कदम (वय २६, माळवटा, तालुका वसमत), महंमद सुलेमान महंमद इस्माईल, महंमद जमील महंमद फय्याजोद्दीन, सय्यद इन्तिहाज अली सय्यद, इर्शाद अली, देविदास सेवक भिमटे, कैलास शामराव ढाकरे, सदाशिव मयन (सर्व नागपूर) यांना पोलिसांनी अटक केली.
छापा टाकला, तेव्हा मुख्य आरोपी दिलीप कदमसह तिघांना पकडले, परंतु इतर आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी शोध घेत दुपापर्यंत इतर आरोपींना पकडले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 1:52 am