झटपट कमाईच्या लोभात प्रवाशांना तिकीट न देता पसे घेणारे एस.टी.च्या तीन वाहकांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई विभागीय वाहतूक अधिकारी सोले तथा गोंदियाचे आगार व्यवस्थापक शेंडे यांनी केली. निलंबित वाहकांची नावे आर.एस. फड, डी.एस. मुलतानी व डी.व्ही. भरूले अशी असून तीन वाहकांवर मार्च महिन्यात गरव्यवहार करताना पकडण्यात आले होते.
एस.टी.चे वाहक दिवसाकाठी दीड लाख रुपयांची तिकिटे चोरी करत असल्याची माहिती गोंदिया आगार व्यवस्थापक शेंडे यांना मिळाली होती. या गरप्रकारावर आळा बसविण्याच्या हेतूने विशेष पथक तयार करून मार्च महिन्यात मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अनेक गरप्रकार त्यांच्या नजरेस पडले. तिकीट न देता प्रवाशांकडून पसे घेणाऱ्या तीन वाहकांविरुद्ध त्यांनी केस तयार केली व या केसच्या आधारे विभागीय वाहतूक अधिकारी सोले यांनी दोषी वाहकांवर निलंबनाची कारवाई केली.
गोंदिया आगारात कार्यरत असलेले निलंबित वाहक आर.एस. फड यांना बाम्हणी फाटाा रेल्वे फाटय़ाजवळ पथकाने पकडले. दरम्यान ७ प्रवाशांपकी ३ प्रवाशांना त्यांनी पसे घेऊन सुद्धा तिकीट दिले नाही. तर एका प्रवाशाला तिकीट दिले नाही. व पसेही घेतले नाही. ही घटना ७ मार्चची असून वाहकांविरुद्ध व्यवस्थापकांनी केस तयार केली होती.
तिरोडा आगाराचे निलंबित वाहक डी.एस. मुलतानी यांनी एकाच दिवशी दोनदा तिकीट न देता पसे घेण्याचा विक्रम केला. २५ मार्च रोजी भंडारा बस वर १७ प्रवाशांकडून पसे घेतले. परंतु तिकीट दिले नाही. याच दिवशी पुन्हा तुमसर-खापा-भंडारा बसवर ८ प्रवाशांकडून पसे घेऊन तिकीट दिले नाही. दरम्यान, भरारी पथकाने त्यांच्यावर केस तयार केली. तिरोडा आगाराचे वाहक डी.व्ही. भरूले यांच्यावर सुद्धा २३ मार्च ला निलंबनाची कारवाई करण्यात आली. लाईन चेकिंग चालू असतांना त्यांनी तिरोडा गोरेगाव बसवर ४ प्रवाशांकडून पसे घेतले; परंतु तिकीट दिले नसल्याची बाब समोर आली.  पथकाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ही घटना गराडा येथे घडली. अशा प्रकारे वेगवेगळ्या तीन बस वाहकांवर विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केल्याने इतर वाहक धास्तावले आहेत.