ओबीसींसाठी सध्या असलेल्या आरक्षणात इतरांची घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे जालना जिल्हा निमंत्रक रामभाऊ उगले यांनी दिला. आघाडीच्या वतीने उद्या (बुधवारी) येथे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित केला आहे.
दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या मेळाव्यास प्रा. अविनाश डोळस, राजेंद्र वनारसे, अॅड. अण्णाराव पाटील, किशोर जाधव, हरिदास भदे, किशोर ढमाले उपस्थित राहणार आहेत. केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण द्यावे, १५ दिवसांत कामाची संचिका हातावेगळी करून निर्णय दिला नाहीतर शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यानंतर प्रतिदिन एक हजार रुपये दंड करावा, शेततळय़ाचा खर्च सरकारने करावा, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा दोन हजार रुपये बेकारी भत्ता द्यावा, सिंचन घोटाळय़ांची निष्पक्ष चौकशी करावी, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात बी-बियाणे, तसेच कीटकनाशके व खतांचा पुरवठा करावा आदी मागण्यांसाठी हा मेळावा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2013 रोजी प्रकाशित
आंबेडकरांच्या उपस्थितीत आज जालना येथे मेळावा
ओबीसींसाठी सध्या असलेल्या आरक्षणात इतरांची घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा निमंत्रक रामभाऊ उगले यांनी दिला. आघाडीच्या वतीने उद्या (बुधवारी) येथे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित केला आहे.
First published on: 11-09-2013 at 01:43 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today rally in jalana for obc reservation problems