11 August 2020

News Flash

कामोठय़ातील ज्वेलर्सवरील दरोडाप्रकरणी दोघांना अटक

कामोठे येथील नूतन ज्वेलर्सवर गेल्या महिन्यात दरोडा पडला होता.

| November 11, 2014 06:24 am

कामोठे येथील नूतन ज्वेलर्सवर गेल्या महिन्यात दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून ७० तोळे सोन्याचे दागिने लपांस केले होते. या दरोडेखोरांना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली  असून, त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. सोमनाथ पांडुरंग दिसले ऊर्फ सोम्या आणि अर्जुन राजकुमार टाक या दोघा दरोडेखोरांना अटक करण्यात आलेली आहे. दोघेही चेंबूर येथील रहिवासी आहे. आरोपींनी दरोडय़ापूर्वी नेरुळ येथील  आपल्या मैत्रिणीच्या भावाची मोटारसायकल चोरली होती. याच मोटारसायकलचा वापर त्यांनी दरोडय़ासाठी केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. मोटारसायकल प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपींकडून दरोडय़ातील सोन्याच्या दागिन्यांपैकी ५ लाख १६ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचा आणखी एक साथीदार किशन करडे याचा शोध सुरू असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2014 6:24 am

Web Title: two arrested in robbery at kamotha jwellers
टॅग Robbery
Next Stories
1 पनवेलमध्ये मनसेचे घंटानाद आंदोलन
2 पनवेल एसटी आगार अनास्थेचा दुसरा बळी
3 ‘सिटी ऑफ बांगलादेशी’
Just Now!
X