जलसंपदा खात्यातील गैरप्रकार मांडणारे विजय पांढरे, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त नीलिमा मिश्रा, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांसारख्या मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी नाशिककरांना यंदाच्या वसंत व्याख्यानमालेनिमित्त मिळणार आहे. व्याख्यानमालेच्या ९२व्या ज्ञानसत्रास १ मेपासून सुरुवात होत आहे.
जीवन विद्या मिशन या संस्थेचे प्रमुख सद्गुरू प्रल्हाद पै हे ‘दिल्याने येत आहे रे’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. संपूर्ण मे महिनाभर दररोज सायंकाळी सात वाजता गंगाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव पटांगणावर ही व्याख्यानमाला रंगणार आहे. उद्घाटन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी विलास पाटील, उपमहापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त संजय खंदारे, स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, मनपा सभागृह नेते शशिकांत जाधव, नाशिक बँकेचे अध्यक्ष हुकूमचंद बागमार उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण मे महिनाभर चालणाऱ्या व्याख्यानमालेतील वक्ते व त्यांचे विषय- २ मे नीलिमा मिश्रा ‘ग्रामीण भारताचे उत्थान’, ३ मे साहित्यिक व विचारवंत हरी नरके ‘देशात स्त्रिया सुरक्षित आहेत का?’, ४ मे एलबीटी महानगरला तारक की मारक?’ या विषयावर परिसंवाद. सहभाग धनंजय बेळे, खुशालभाई पोद्दार, गुरुमित बग्गा, ५ मे सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार ‘काश्मीर प्रश्न आणि सरहद्द’, ६ मे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा ‘मिशन लोकसभा २०१४’, ७ मे गिरीश गांधी ‘सध्याची सामाजिक व राजकीय स्थिती’, ८ मे संगीतकार संजय गीते व सहकारी यांचा मनोसंगीत-सकारात्मक जीवन संगीत शैली हा कार्यक्रम, ९ मे प्रा. डॉ. मधुरा कोरान्न्ो ‘आधुनिक मराठी नाटकातील स्त्री प्रतिमा’, १० मे शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकाऱ्यांचा कार्यक्रम, ११ मे मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव शेखर गायकवाड ‘प्रॉपर्टी व माणूस, १२ मे डॉ. सचिन परब, ‘२१व्या शतकातील समस्या व समाधान, १३ मे डॉ. अंबादास कुलकर्णी ‘अभिरूप न्यायालयामध्ये प्रश्नोत्तरे’, १५ मे वर्षां देशपांडे ‘लेकींच्या जन्मासाठी, १६ मे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य अभियंता विजय पांढरे ‘अध्यात्म आणि विज्ञान’, १७ मे हरी गोखले ‘आम्ही भारतीय व आमची सेना-एक जाणिवांचा खेळ, १८ मे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अजित रानडे ‘आर्थिक विकास आणि विषमता’, १९ मे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रसन्न प्रभू ‘जीवन जगण्याची कला’, २० मे लक्ष्मण महाडिक ‘कुणब्याची कविता’ व तुकाराम धांडे ‘डोंगराची कविता’, २१ मे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार ‘समाज आणि मूल्य’, २२ मे प्रकाश पाठक ‘आजच्या युगात स्वामी विवेकानंदांची आवश्यकता’, २३ मे डॉ. प्रकाश पानसरे व पंकज चौधरी ‘सहजयोग ध्यान धारणेचे फायदे’, २४ मे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व साहित्यिक अभिमन्यू सूर्यवंशी ‘कुण्या एकाची धरणगाथा’, २५ मे प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर ‘सर्वासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, २६ मे साहाय्यक आयकर आयुक्त भरत आंधळे ‘स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने’, २७ मे शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंदिया ‘शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दुष्काळ संपणार केव्हा?’ २८ मे रागिणी कामतीकर आणि सहकारी ‘वंदे मातरम्’ देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, २९ मे ‘लोकसत्ता’चे नवी दिल्लीतील विशेष प्रतिनिधी सुनील चावके ‘आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरची राजकीय स्थिती’, २० मे डॉ. कैलास कमोद ‘नदी-आपली आणि परदेशातली’, ३१ मे जयंत पाटेकर आणि सहकाऱ्यांचा गाण्यांचा कार्यक्रम.
वसंत व्याख्यानमालेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, उपाध्यक्ष विजय हाके, जयप्रकाश जातेगावकर, सरचिटणीस संगीता बाफना, खजिनदार अरुण शेंदुर्णीकर व मालेच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.