News Flash

मराठी माणसाचा गड जिंकण्याचे आव्हान

दादर हा मराठी माणसाचा गड आणि त्यामुळे शिवसेनेचा एकेकाळचा पारंपारिक बालेकिल्ला. शिवसेनेने या मतदारसंघावर अधिराज्य होते.

| October 14, 2014 06:05 am

माहीम
दादर हा मराठी माणसाचा गड आणि त्यामुळे शिवसेनेचा एकेकाळचा पारंपारिक बालेकिल्ला. शिवसेनेने या मतदारसंघावर अधिराज्य होते. परंतु २००९ मध्ये मनसेने हा मतदारसंघ खेचून घेतला आणि शिवसेनेला िखडार पाडले होते. हा घाव शिवसेना सोसत होतीच त्याचवेळी मागील पालिका निवडणुकीत मनसेने सर्वच्या सर्व म्हणजे सातही नगरसेवकांच्या जागा काबीज करून शिवसेनेचे नाक कापले. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनाही ही वाताहत जिव्हारी लागली आणि त्यांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. शिवसेनेचे मातब्बर नेते सदा सरवणकर यांनी शिवसेनेपासून फारकत घेऊन कॉंग्रेसची वाट धरली होती. त्यामुळे शिवसेनेला फटका बसला होता. आता पुन्हा ते शिवसेनेत परतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ३ लाख १० हजार मतदार येथे आहेत. यंदा ९ उमेदवार या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपच्या विलास आंबेकर आणि शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्यात मराठी मतांच्या विभागणीची शक्यता आहे. कॉंग्रेसतर्फे प्रवीण नाईक तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रमेश परब िरगणात आहेत.  
’ पाणीटंचाईच जास्त
सेंच्युरी बाजारपासून हा मतदारसंघ सुरू होतो. माहीम, शिवाजी पार्क परिसराचा त्यात समावेश होतो. माहीम-कोळीवाडय़ातील चाळींतील मतदारांपासून दादर-प्रभादेवीसारखा उच्चमध्यमवर्गी यांचा समावेश असलेला बहुरंगी मतदारसंघ. संमिश्र मिश्र वस्ती या मतदारसंघातही येथे आहे. गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजना अंमलात आलेली नाही. पोलीस वसाहतींचा जटील प्रश्न कायम आहे. आझाद नगर येथे नाल्यावर वसाहती आहेत. उपकर प्राप्त इमारतींचा प्रश्नही आहे. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. दरवर्षी पावसाळ्यात चार ते पाच इमारती कोसळत असतात. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, पाणी टंचाई आदींमुळे नागरिक त्रस्त आहेत. पालिकेच्या कामगार वसाहतींची दुरवस्था आहे.   
स्थानिक आमदार केवळ होर्डिगवर लोकांना दिसतात. नगरसेवकही लोकांपासून दूर झालेले आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा विकास रखडलेला आहे. उपकरप्राप्त १९ इमारती असून त्यांचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. शिवसेनाप्रमुखांचे मोफत घरांचे स्वप्न मतदारसंघात साकार करण्याचा प्रयत्न राहील. झोपडपट्टय़ा पुनर्विकास योजना राबवून सर्वसामान्यांना घरं मिळवून देणार आहे.
सदा सरवणकर,
शिवसेना
पक्षभेद न बघता काम करत गेलो. जुन्या चाळींचा विकास, पोलीस वसाहतींचा विकास, कोळीवाडय़ांचे प्रश्न आणि रस्ते या चार प्रमुख मुद्दय़ांवर निवडणुका लढवत आहे. स्वत:ची व्होटबँक आहे. पक्षाचे सात नगरसेवक असल्याने साहजिकच सर्वदूर जाळे पसरले आहे.
 नितीन सरदेसाई,
मनसे,  विद्यमान आमदार
उमेदवार
मनसे – नितीन सरदेसाई ल्ल  शिक्षण- बी. एसस्सी *  मालमत्ता, स्थावर – ४ कोटी रुपये, जंगम- ६ कोटी ५५ लाख रुपये
शिवसेना – सदा सरवणकर ल्ल  शिक्षण- १०वी *  मालमत्ता, स्थावर-३० कोटी ९ लाख ९३ हजार रुपये, जंगम-३० कोटी ७० लाख रुपये
कॉंग्रेस – प्रवीण नाईक ल्ल  शिक्षण- बी.आर्किटेक  *  मालमत्ता, स्थावर – २ कोटी ८१ लाख २५ हजार ५००, रुपये, जंगम – १ कोटी ७ लाख ६६ हजार २५२ रुपये,
राष्ट्रवादी – रमेश परब ल्ल  शिक्षण – १०वी, *  मालमत्ता, स्थावर – ३ लाख ४४ हजार रुपये, जंगम- १८ लाख ८५ हजार ०२५ रुपये
भाजप – विलास आंबेकर ल्ल  शिक्षण- १२वी *  मालमत्ता, स्थावर – १ कोटी रुपये, जंगम -३६ लाख १५ हजार रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 6:05 am

Web Title: voter indicator mahim
Next Stories
1 काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान
2 वांद्रे पूर्व : शिवसेनाच!
3 निवडणूक आयोगाच्या प्रचारसाहित्यात भाषेची मोडतोड
Just Now!
X