महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बुटीबोरी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील अस्थायी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनासमोर ९ डिसेंबरपासून धरणे आंदोलन करणार आहेत.
हे कर्मचारी १९९४ पासून सेवा करत आहेत. ऐन दिवाळीत महामंडळाने एक पत्रक काढून या कामगारांचे वेतन कमी केले. कमचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच वेतन द्यावे, २० टक्के बोनस द्यावा, घरभाडे भत्ता द्यावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन महामंडळाला दिले होते. परंतु कर्मचाऱ्यांना कामाहून कमी करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. कामगारांच्या वेतनात कपात केल्याने त्यांनी वेतन घेतले नाही. मागण्या पूर्ण करण्यासाठी नागपूर जनरल लेबर युनियनतर्फे ९ डिसेंबरपासून विधानमंडळ परिसरात सहकुटुंब धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अमृत मेश्राम यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 9:41 am