पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्या बंगल्यावर सशस्त्र चोरटय़ांनी दरोडा घालून २५ तोळे सोन्यासह सव्वा लाखाची रोकड लुटून नेली. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास शहरातील शेळगी येथे हा प्रकार घडला.
शामराव महादेव गाडे हे पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता आपल्या कुटुंबीयांसह शेळगी येथे राहतात. पहाटेच्या सुमारास कारमधून आलेल्या चोरटय़ांनी गाडे यांच्या बंगल्यावर दरोडा घातला. बंगल्याचा समोरील दरवाजा तोडून दरोडेखोरांनी बंगल्यात घुसल्यामुळे गाडे कुटुंबीय झोपेतून जागे झाले. दरोडेखोरांनी गाडे कुटुंबीयांना पिस्तूल, तलवार व कु ऱ्हाडीचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. दरोडेखोरांची संख्या सहा एवढी होती. त्यांच्या दहशतीमुळे गाडे कुटुंबीयांनी आपल्या ताब्यातून सव्वा लाखाची रोकड तसेच २५ तोळे सोन्याचे दागिने दरोडेखोरांच्या हवाली केले. बाजारभावाप्रमाणे लुटले गेलेल्या सोन्याची किंमत सुमारे नऊ लाख एवढी आहे.
दरोडेखोरांनी दरोडा घालून पोबारा केल्यानंतर गाडे कुटुंबीयांनी शेजारच्या मंडळींना हाक दिली. नंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद नोंदविण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्ह्य़ाच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्य़ाच्या पद्धतीचे निरीक्षण केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2013 रोजी प्रकाशित
सोलापुरात निवृत्त अभियंत्याच्या घरावर दरोडा; दहा लाखांची लूट
पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्या बंगल्यावर सशस्त्र चोरटय़ांनी दरोडा घालून २५ तोळे सोन्यासह सव्वा लाखाची रोकड लुटून नेली. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास शहरातील शेळगी येथे हा प्रकार घडला.
First published on: 05-03-2013 at 09:23 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 lakh looted from retd engineers house