धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी तिसऱ्या टप्प्यात आणखी १५ ट्रक चारा, धान्य आदी स्वरूपातील मदत रवाना झाली आहे.    
धनंजय महाडिक, रामराजे कुपेकर यांच्यासह प्रमुखांच्या उपस्थितीत मदतीचे हे ट्रक तासगाव, आटपाडी,मोहोळ, कुर्डूवाडी आदी ठिकाणच्या दुष्काळग्रस्त जनतेसाठी रवाना करण्यात आले आहेत. आजच्या १५ ट्रकसह आतापर्यंत ५० ट्रक चारा आणि धान्य युवाशक्तीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी रवाना करण्यात आलेआहेत.    
ए.जे.पाटील, शैलेश पाटील, संदीप सावंत, ऋषीकेश पाटील, श्री. दोशी आदी चारा देणगीदार आहेत. या विधायक कार्यात भागीरथी महिला संस्था, बी.टीव्ही, भीमा हेल्थ झोनमधील कर्मचाऱ्यांनीही रोख निधी आणि धान्यरूपाने आपली मदत दिली आहे. फ्युचर जनराली इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम, एम.एस.जनरलइन्शुरन्स कंपनी, अलाहाबाद बँकेतील अधिकारी व कर्चमाऱ्यांनीसुद्धा दुष्काळी जनतेसाठी मदत दिली आहे. या वेळी मिलिंद धोंड, इंद्रजित जाधव, रहीम सनदी, नीलेश पटेल, वितेश नाईक, नागेश पाटील, दिग्विजय घोरपडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.