कुर्डूवाडी येथे बाहय़वळणावर रस्त्याच्या कठडय़ावर भरधाव वेगातील मोटार आदळून घडलेल्या अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. तिघेही मृत मुंबईचे रहिवासी होत.
राहुल सत्यपालसिंग सबरवाल (वय २५, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई), सलीम करीम शेख (वय २५, रा. जोगेश्वरी पश्चिम, मुंबई) व शेख आझाद शेख अली (वय २७, रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. मृत राहुल बसरवाल हे होंडा सिटी (एमएच ०६-एम ३०) ही मोटार घेऊन मुंबईहून बार्शीमार्गे कळंबकडे निघाले होते. परंतु वाटेत पहाटेच्या वेळी कुर्डूवाडी येथे पंढरपूर चौकात रस्त्याच्या कठडय़ावर सदर भरधाव वेगातील मोटार आदळली आणि हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यातील तिघे तरुण जागीच मरण पावले. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2013 रोजी प्रकाशित
कुर्डूवाडीत मोटार अपघातात मुंबईच्या तिघा तरुणांचा मृत्यू
कुर्डूवाडी येथे बाहय़वळणावर रस्त्याच्या कठडय़ावर भरधाव वेगातील मोटार आदळून घडलेल्या अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. तिघेही मृत मुंबईचे रहिवासी होत. राहुल सत्यपालसिंग सबरवाल (वय २५, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई), सलीम करीम शेख (वय २५, रा. जोगेश्वरी पश्चिम, मुंबई) व शेख आझाद शेख अली (वय २७, रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. मृत राहुल बसरवाल हे होंडा सिटी (एमएच ०६-एम ३०) ही मोटार घेऊन मुंबईहून बार्शीमार्गे कळंबकडे निघाले होते. परंतु वाटेत पहाटेच्या वेळी कुर्डूवाडी येथे पंढरपूर चौकात रस्त्याच्या कठडय़ावर सदर भरधाव वेगातील मोटार आदळली आणि हा अपघात झाला.
First published on: 24-01-2013 at 08:19 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 killed in kurduwadi motor accident