मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे तिसावे वार्षिक अधिवेशन उद्या (शुक्रवारी) व शनिवारी जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात होणार आहे. उद्या सकाळी ११ वाजता डॉ. इंद्रजित आल्टे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. शिवकालीन अर्थनीती, बारावी पंचवार्षिक योजना, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधाच्या विषयांवर अधिवेशनात परिसंवाद होणार आहे.
डॉ. बी. आर. गायकवाड, डॉ. भारत, डॉ. संजीव लाटे, डॉ. के. के. पाटील, प्रा. एस. एम. कांबळे डॉ. शंकर अंभोरे आदींचा यात सहभाग आहे. शनिवारी दुपारी ३ वाजता समारोपास डॉ. भागवत कटारे, प्रा. एस. एस. वाल्दे उपस्थित राहणार आहेत.