सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थितीत मुक्या वन्यप्राण्यांची तहान भागविण्याकरिता पाण्याच्या साठवणुकीसाठी श्री राजस्थानी समाज, सरस्वती एज्युकेशन, हेल्थ फौेडेशन व मित्र परिवाराच्या वतीने ४० टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दोन हजार लिटर क्षमतेच्या सिंटेक्सच्या २० तर ५०० लिटर क्षमतेच्या सिमेंटच्या २० टाक्यांचे वितरण करण्या़ात आले. उपवन संरक्षक के. डी. ठाकरे, वनक्षेत्रपाल डी. ए. हजारे, वनपाल एस. पी. कांबळे, वनसंरक्षक एस. बी. कुताटे, तसेच सरस्वती फौेंडेशनचे विश्वस्त अजय बाहेती, तिलोकचंद मुनोत, अनिल पटवारी, जयनारायण भुतडा, बालमुकुंद आसावा, सतीश लाहोटी, जुगल पालीवाल, विजय बलदवा, डॉ. गिरीश हारकूट, रवींद्र आरकाल, नीलेश जाजू, नूरसाहेब आदी उपस्थित होते.
या पाण्याच्या टाक्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, किनाळी, चुंगी, उटगी, कल्लप्पावाडी आदी ठिकाणी वन विभागात वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी देण्यात आल्या. याशिवाय मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आदी तालुक्यांमध्येही वनप्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्या वितरित केल्या जाणार आहेत, असे अजय बाहेती यांनी सांगितले.