पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार महामार्गावरून सेवा रस्ता व महामार्गादरम्यानच्या गटारात जाऊन पलटी झाली. कराड तालुक्यातील पाचवड फाटय़ानजीक ही घटना घडली. अपघातात पुण्यातील पाच जण जखमी झाले. कार्तिक मिश्रा (वय १९), तेजस ठक्करलाल लोहाना (वय २०, दोघेही रा. कोथरूड, पुणे), तिलांक राजेंद्र (वय २०, शास्त्रीनगर, पुणे), लक्ष भटनागर (वय २०), राहुल पाल (वय २० दोघेही रा. भारती विद्यापीठ, पुणे) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
कराडजवळ कार अपघातात पुण्याचे पाच जण जखमी
पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार महामार्गावरून सेवा रस्ता व महामार्गादरम्यानच्या गटारात जाऊन पलटी झाली.
First published on: 07-02-2014 at 03:07 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 injured in car accident near karad of poona