जिल्हा हौशी बॉडी बिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि. २५) येथे ‘धाराशीव श्री २०१२’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळय़ा वजन गटांतून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांना ५१ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. संयोजक संजय यादव व राहुल बचाटे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. स्पर्धा ५० ते ५५ किलो, ५५ ते ६० किलो, ६० ते ६५ किलो व ६५ किलो अशा चार वजन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. विजेत्यांमधून ‘धाराशीव श्री २०१२’ची निवड करण्यात येणार असून त्यास ५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते होणार आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित राहणार आहे.