अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून पोलीस नाईक असलेला आरोपी जमीनखान मुस्तफाखान पठाण याला न्यायालयाने ७ वर्षे कैदेची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
बीड पोलीस दलात कार्यरत असलेल्या पठाण याने मागील वर्षी १६ वर्षांच्या या मुलीला खोटे बोलून बिंदुसरा येथे पोलिसांच्या विश्रामगृहावर नेऊन बलात्कार केला. मुलीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने १२ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीला दोषी ठरवले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनय बोरीकर यांनी सोमवारी खटल्याचा निकाल देताना आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे एन. एन. साबळे व अॅड. अजय तांदळे यांनी काम पाहिले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2013 रोजी प्रकाशित
मुलीवर बलात्कारप्रकरणी पोलिसाला ७ वर्षांची कैद
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून पोलीस नाईक असलेला आरोपी जमीनखान मुस्तफाखान पठाण याला न्यायालयाने ७ वर्षे कैदेची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
First published on: 04-06-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 years imprisonment to police on girl rape case