महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी राज्यभरात ग्राम पंचायत स्तरावर स्वतंत्र व सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने १ डिसेंबर २०१२ पासून हमी योजना काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे.
या आंदोलनाच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समितीस्तरावर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर  बुलढाणा जिल्हयातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला बांधकाम सभापती बलदेवराव चोपडे विरोधी पक्ष नेते वसंतराव भोजने, जि.प. सदस्य राजेंद्र ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख अर्जुन दांडगे, तहसीलदार संघटनेचे राज्यउपाध्यक्ष सुरेश बगळे, तहसीलदार दिनेश गिते, विदर्भ पटवारी संघटनेचे विजय टेकाडे , कृषी सहायक संघटनेचे रविंद्र म्हस्के , विस्तार अधिकारी संघटनेचे संदिप दळवी, तलाठी संघटनेचे दांडगे यांनी पाठिंबा दर्शविला. या धरणे आंदोलनासाठी जिल्हाध्यक्ष व्हि.आर.चव्हाण, सरचिटणीस प्रशांत जामोदे, कार्याध्यक्ष मोतीराम ढवळे, सुभाष दुबे, मानदध्यक्ष श्रीधर काळे , उपाध्यक्ष अशोक बुटकूल, शिवसींग राजपूत ग्रामसेवक , पतसंस्थेचे सचिव मनोहर ठुमरे, अध्यक्ष राजेश्वर खेडेकर, उपाध्यक्ष म्हस्के, महासंघाचे विभागीय सचिव संदीप मोरे सर्व तालुक्याचे अध्यक्ष सचिव यांनी परिश्रम घेतले.