गेल्या तीन ते चार दिवसांपासून अकोल्यात चांगलीच थंडी पडत आहे. त्यामुळे अनेकांना या थंडीचा त्रास होताना दिसतो. गेल्या चोवीस तासात यंदाचे सर्वात कमी तापमान अकोल्यात नोंदविले गेले. आज अकोल्यातील किमान तापमान ६.९ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २५.६ अंश सेल्सिअस होते.
शहरातील वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी लोकांनी शेकोटी पेटविणे सुरू केले आहे. गरिबांनी रस्त्यावर काडीकचरा गोळा करत शेकोटी करणे सुरू केले आहे. थंडीमुळे अकोलेकर चांगलेच हैराण झाले आहेत.
पारा घसरल्याने नागरिकांचा दिवस थोडा उशिरानेच सुरू होत आहे. या गारठय़ात गरमा गरम चहा व फराळ करण्याकडे नागरिकांचा कल दिसत आहे.