गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मध्य रेल्वेच्या दादर स्थानकास अचानक भेट दिली. पाटील यांनी फलाट क्रमांक सहावर फिरून सुरक्षेचा आढावा घेतला असल्याचे सांगण्यात येते. पाटील यांची ही भेट अकस्मात असल्याचे दादर रेल्वे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
या भेटीत त्यांनी रेल्वे स्थानकावरील सुरक्षा आणि अन्य बाबींविषयक पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पाटील यांची ही भेट नेमकी कशासाठी होती, त्या बाबत अधिक तपशील दादर रेल्वे पोलीस ठाण्याकडून मिळाला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 5th Mar 2013 रोजी प्रकाशित
आर. आर. पाटील यांची दादर रेल्वे स्थानकास अचानक भेट
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मध्य रेल्वेच्या दादर स्थानकास अचानक भेट दिली. पाटील यांनी फलाट क्रमांक सहावर फिरून सुरक्षेचा आढावा घेतला असल्याचे सांगण्यात येते. पाटील यांची ही भेट अकस्मात असल्याचे दादर रेल्वे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
First published on: 05-03-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All of sudden r r patil visit dadar raiway station