जालना जिल्हा तलाठी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष टी. आर. ताम्हणे यांच्यासह पदाधिकारी-सदस्य या आंदोलनात सहभागी झाले. तलाठी सज्जाची पुनर्रचना करावी, मंडल अधिकाऱ्यांना कृषी पर्यवेक्षकाप्रमाणे पगार मिळावा, कार्यालयीन भत्त्यात वाढ करावी, लॅपटॉप पुरवठा करावा, सीआरपीच्या १५६(३) कलमात सुधारणा करावी, नायब तहसीलदारांना तहसीलदारपदावर पदोन्नती देण्याच्या कोटय़ात बदल करावा, मासिक पगारात प्रवासभत्ता मंजूर करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2013 रोजी प्रकाशित
जालनामध्येही धरणे आंदोलन
जालना जिल्हा तलाठी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष टी. आर. ताम्हणे यांच्यासह पदाधिकारी-सदस्य या आंदोलनात सहभागी झाले.
First published on: 17-01-2013 at 01:32 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andolan in jalna