मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सिडको येथील कर्मवीर शांताराम कोंडाजी वावरे महाविद्यालयात शिकत असलेला सोहम कुलथे याची दिल्ली येथे १७ ते २३ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत १० मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
मुंबई येथे झालेल्या खुल्या युवा राज्य पातळीवरील एअर रायफल शूटिंग स्पर्धेत त्याने तिसरा क्रमांक मिळविला. त्यानंतर १७ व १८ नोव्हेंबर रोजी बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या पश्चिम विभागीय स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळविला. या स्पर्धेतील कामगिरीवरून त्याची दिल्लीच्या स्पर्धेसाठी निवड झाली.