डोंबिवलीतील अयोध्यानगरीत चोरी करण्यासाठी आलेल्या चोरटय़ांनी पोलिसांवर गोळीबार करून पळ काढला होता. या चोरटय़ांपैकी बलासिंग याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. तो शिकलकर टोळीतील असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिनाभरापूर्वी अयोध्यानगरीत एका घरात चोरी करण्यासाठी काही चोरटे आले होते. नागरिकांना याची चाहूल लागताच त्यांनी ओरडा करून पोलिसांना बोलाविले. पोलिसांनी चोरटय़ांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर चोरटय़ांनी गोळीबार केला. एका वृत्तपत्र विक्रीच्या गाडी चालकाला धाक दाखवून या चोरटय़ांनी कल्याणच्या दिशेने पलायन केले. गाडी चोरटय़ांनी कल्याणला सोडून दिली होती.