शहरातील गुरुवार पेठेतील के. व्ही. आदोने ड्रेसेसचे चालक नागनाथ आदोने यांच्या पत्नी अरुणा नागनाथ आदोने (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन पुत्र, एक कन्या, बंधू असा परिवार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते काशीनाथ आदोने यांच्या त्या भावजय होत. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष तम्मा गंभीरे, नगरसेविका प्रा. सुशीला आबुटे, सोलापूर जिल्हा द्राक्ष संघाचे डॉ. चन्नगोंडा हविनाळे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष शंकर पाटील, रिपाइंचे प्रदेश नेते राजा सरवदे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.